आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत कृषि विभागाची महत्वाकांक्षी योजना pmfme | Atmanirbhar Bharat mohimeantargat krishi vibhagachi mahatvakanshi Yojana

 

केंद्र शासन सहाय्यित


आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत कृषि विभागाची महत्वाकांक्षी योजना...

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

🙏    समाविष्ट जिल्हे :- महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्हे (मुंबई शहर व मुंबई उपनगर समाविष्ट)

                                     नोंदणीसाठी येथे क्लिक करा.. click here...
                                 https://pmfme.mofpi.gov.in/pmfme/#/Home-Page

1. सध्या कार्यरत असलेल्या व नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचा विस्तार वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे            आणि नवे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करणे. 

सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षासाठी संपूर्ण राज्यभर लागू.

2. सर्व प्रकारच्या नवीन व कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत लाभ. (Credit                       Linked Bank Subsidy)

3. आजारी सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगही बँक कर्ज उपलब्ध होत असल्यास पात्र.

4.  पारंपारीक / स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन .(Vocal For Local Local To Global)

5. वैयक्तिक लाभार्थी प्रगतशील शेतकरी, नव उद्योजक, बेरोजगार युवक, महिला वैयक्तिक मालकी/ भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था (FPO), स्वयंसहायता गट (SHG). गैर सरकारी संस्था (NOG), सहकारी संस्था (Cooperative), खाजगी कंपनी (Pvt. Ltd. Companies) इत्यादी.

6. गट लाभार्थी / CIF शेतकरी उत्पादक संस्था (FPO) / शेतकरी उत्पादक कंपनी (FPC). सहकारी संस्था                 (Cooperative), स्वयंसहायता गट. (SHG) आणि त्यांचे फेडरेशन  (उदा. MSRLM-CLF, MAVIM-VLF, CMRC/NULM-ALF) शासकीय संस्था.

7. एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) किंवा NON-ODOP साठीचे प्रस्ताव सहाय्यासाठी पात्र तथापि ODOP             प्रस्तावांना प्राधान्य.

8. योजनेमध्ये नाशवंत फळपिके, कोरडवाहू पिके, भाजीपाला, अन्नधान्ये, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया,          मसाला पिके, गुळ इत्यादींवर आधारित उत्पादने, दुग्ध व पशु उत्पादने, सागरी उत्पादने, मांस उत्पादने, वन उत्पादने इत्यादी उत्पादनांचा समावेश 

9. योजनेची सर्व प्रक्रिया Online. संगणकांसोबत मोबाईल वरून देखील अर्ज सादर करता येईल. एकाच लाभार्थ्याला योजनेंतर्गत सर्व घटकांचा लाभ घेता येईल..


 सर्व सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना लाभ तथापि ODOP ना प्राधान्य

फळे उत्पादने :-  पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगांव, सांगली, जालना, बीड, अमरावती,बुलढाणा, नागपूर.


मासे व सागरी उत्पादने :-  मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड.


तृणधान्य उत्पादने :- औरंगाबाद, भंडारा, गोंदिया, चंदपूर.


भाजीपाला उत्पादने :- नाशिक, पुणे, लातूर.


पोस्टिक तृणधान्य उत्पादने :- ठाणे, नंदूरबार, सोलापूर.


कडधान्य उत्पादने :- अकोला, उस्मानाबाद.


तेलबिया उत्पादने  :- वाशिम.


मसाला उत्पादने :- नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा.


ऊस / गुळ उत्पादने :- कोल्हापूर, सातारा, परभणी.


दुध व दुग्धजन्य पदार्थ :- अहमदनगर.


किरकोळ वन उत्पादने :- गडचिरोली.


वैयक्तिक लाभार्थी निवडीचे निकष :-

अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार (प्रोपाइटरी / भागीदारी / प्रायव्हेट लि.) असावा.

गट लाभार्थी निवडीचे निकष. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे. एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल.

सदर उद्योगाला औपचारिक दर्जा प्राप्त करून देण्याची तयारी असावी.

प्रकल्प किंमतीच्या किमान १०% लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बैंक कर्ज घेण्याची तयारी असावी.

गट लाभार्थी निवडीचे निकष :-

सर्व अन्न प्रक्रिया उद्योगांच्या प्रक्रियेमध्ये कार्यरत शेतकरी उत्पादक गट / कंपनी / स्वयंसहाय्यता गट /   उत्पादक सहकारी संस्थांना लाभ देय आहे.

प्रकल्प किंमतीच्या किमान १०% लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बैंक कर्ज घेण्याची तयारी असावी.


योजनेअंतर्गत घटक लाभार्थी आणि आर्थिक मापदंड :-

१. प्रशिक्षण :-

 योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीने कर्जमंजूरीसाठी बँकेकडे शिफारस केलेले वैयक्तिक लाभार्थी (३ दिवस प्रशिक्षण) 

योजनेअंतर्गत बीज भांडवल लाभ मिळालेले स्वयं सहाय्यता गटांचे लाभार्थी (१ दिवस प्रशिक्षण)अनुदान १००%

२. बीज भांडवल :-

ग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील स्वयंसहाय्यता गटातील सदस्य, गट, त्यांचे फेडरेशन यांना लहान मशिनरी (Small Tools) खरेदी करण्यासाठी व खेळते भांडवल (Working Capital) यासाठी प्रति सदस्य कमाल रक्कम रु. ४०,०००/- व प्रति स्वयंसहाय्यता गट कमाल रक्कम रु. ४,00,000/-

३. वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग :-

वैयक्तीक मालकी/ भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था.

                                                      नोंदणीसाठी येथे क्लिक करा.. click here...
                                             https://pmfme.mofpi.gov.in/pmfme/#/Home-Page



Share:
Location: Maharashtra, India

No comments:

Post a Comment

Powered by Blogger.

Blog Archive

Total Pageviews

Contact Form

Name

Email *

Message *

Translate

Followers

Popular Posts